Tuesday, May 02, 2017

ऐन उन्हाळ्यात..

आणि एक दिवस तुम्ही तुमच्या शहरात परत येता,
ऐन उन्हाळ्यात..
शहरातल्या धूळभरल्या रस्त्यांवर उष्ण तापलेले निखारे. घामाच्या धारांमधे भिजलेली माणसे
हजारोंनी वहाने, मॉल, मेट्रो मधे..
इंच इंच जागा भरलेली, दाटीवाटी आणि गर्दी अनंत पटीने वाढलेली
पण शहराने त्यातही तुमचा निवारा तसाच राखून ठेवलेला आहे.
शहराशी तुम्ही बेवफ़ाई केलेली असली तरी ते तुमच्याशी एकनिष्ठ
याबद्दल उद्या शहराचे आभार मानायची नोंद टू डू लिस्टमधे केलेली आहे
मध्यरात्री मळकट अंधारे शहराचे छत पहात तुम्ही बाल्कनीत उभे असता
शहर बेवारस होतं तुम्ही इथे नसताना असा एक भ्रम उगीचच मनात उच्चारता
दिवसभर तापून निघालेलं शहर अजूनही वाफ़ारलेलेच आहे
पूर्वीही असायचं तसंच. ही एक उगीच न हरवलेली गोष्ट मिळाल्याचा आनंद.
समुद्र शोधायचा आहे उद्या
अजून एक नोंद.
परत आल्याची खुशी, मजा, आनंद
नेमकं काय काय आहे मनात
तुमच्या आणि शहराच्याही हे तुम्हाला आत्ता नेमकं कळत नाहीय
आता इथेच रहायचं आहे, उद्यापासून एकमेकांसोबत ही जाणीव
शहराच्या आणि तुमच्या हृदयात धडधड वाढवते आहे.
पण तुम्ही आश्वस्त आहात.
कायम वर्तमानात जगणारे हे शहर तुमचा भुतकाळ खोदायच्या भानगडीत पडणार नाही
भविष्याचे बोगदेही उपसणार नाही
ऐन उन्हाळ्यात
पुन्हा या शहरात परतून आलेल्या तुम्हाला इथे गारवा मिळणार आहे
याची खात्री शहरात येण्याआधी पासूनच तुम्हाला आहे.
त्यामुळे.. भेटत राहूया.
इथेच. या शहरात.


8 comments:

आंबट-गोड said...

ट्युलिप.................!!!
लव्ह यू!अश्विनी

Tulip said...
This comment has been removed by the author.
Prashant K said...

Welcome back! :) Hope you keep posting regularly now.
Found this blog by following links from other blogs. You were actively posting here at the time. Read all posts and liked them. I still have many of your posts I saved to Google Reader.
One gets mesmerized while reading your blog.

Meghana Bhuskute said...

ऑ! तू ब्लॉग उघडला असशील ही आशा इतकी सोडली होती, की येऊन बघायचेही कष्ट घेतले नाहीत. जाम म्हणजे जाम म्हणजे जाम आठवण काढली तुझी. गायब होऊ नकोस. स्टॅचू.

kshipra said...

मेघनाशी सहमत.

Samved said...

लिहावं की न लिहावं हाच प्रश्न होता. भरकटल्यासारखी माणसं निघून जातात, अस्तित्वाचे कुठलेही दंश मागे न ठेवता तेव्हा तिकडे हरवू पाहणाऱ्या माणसांसोबतच मागे राहिलेली माणसेही हरवत असतातच ना?

PANKAJ BHAVSAR said...

तू नसशील तर यातच सामवले आहे उत्तर

PANKAJ BHAVSAR said...

तू नसशील तर यातच सामवले आहे उत्तर