Tuesday, July 22, 2008

(स्टुडिओ)

सिस्टाईन चॅपेलाच्या छतावर द लास्ट जजमेन्ट मायकेल ऍन्जेलो सलग तिन वर्ष रंगवत होता.पण त्यानंतर उरलेलं फ़्रेस्को करताना मात्र तो कंटाळून गेला.
त्याच्यातली उर्मीच कुठे तरी गळून पडल्यासारखी झाली.
तरी तो काम करतच होता.
आकृत्या मनाप्रमाणे उमटत नव्हत्या.त्या चुकलेल्या फ़िगर्सवर सतत प्लास्टर एकावर एक भरुन तो त्या दुरुस्त करत राहिला. आणि अर्थातच हे करत असताना तो सुखी नव्हता.
काय करावं ह्या फ़्रेस्कोच्या कामाचं हा विचार मनात घेऊन तो आपल्या प्रेयसीबरोबर अशाच एका कंटाळवाण्या संध्याकाळी वाईनबार मधे गेला.तिथे झिंगलेल्या काही दारुड्यांचं वेटर्सबरोबर जोरदार भांडण सुरु होतं.दुर्लक्ष करत मायकेल बराच वेळ वाईन पित राहिला.असह्य झाल्यावर उठला.
तितक्यात जिन्यावरुन गुत्त्याचा मालक खाली आला.
काय तक्रार आहे तुमची? त्या मालकाने दारुड्यांना विचारलं.
वाईन खराब आहे.नेहमीची मजा नाही येतय.दारुडे बरळत म्हणाले.
वेटर मधे पडले आणि मालकाला सांगायला लागले की लक्ष नका देऊ तुम्ही.दारु फ़ुकटात रिचवण्यासाठी केलेली नाटकं आहेत.
मालकाने एकदा दरवाजाच्या दाराशी पोचलेल्या मायकेल ऍन्जेलो कडे पाहिले आणि तो त्या वेटर्सना म्हणाला,"दारु खराब असेल किंवा नसेल.चर्चा नको.बॅरेल रस्त्यावर ओतुन द्या.नविन वाईन उघडा आणि पाजा त्यांना."(मायकेलसारखं एक कलावंत गिर्हाईक वाईनबार मधून उठून जाण्यापेक्षा बॅरेलभरुन वाईन फ़ुकट गेलेली चालेल मला.मालक म्हणाला असेल कां नंतर वेटर्सना?

इकडे मायकल मात्र त्या घटनेतून एक वेगळच इन्स्पिरेशन घेऊन चर्चमधे परतला.वाईन खराब आहे?चर्चा नको.सरळ ओतुन द्या.
मायकेलने छतावरचं सगळं प्लॅस्टर खरवडून,तोडून काढून छत स्वच्छ केलं. नव्याने फ़िगर्स रचायला लागला फ़्रेस्कोसाठी. त्याचा गोंधळ संपला.

पूर्ण अंगभूत व्हावं लागलं तरच नवनिर्मिती सोपी होते.
पदार्थ बिघडत चालला तर तो फ़ेकून द्या.त्यात पुन्हा पुन्हा काही मसाले घालून सुधारणा करत बसू नका.
एखादा कॅन्व्हास जर चुकला तर तो जाळावा,कापावा आणि नविन घेऊन नविन खेळ मांडावा.. (सुभाष अवचट)


सिस्टाईन चॅपेलमधे काम करणार्या ऍन्जेलोची अननोन इन्स्पिरेशनची गोष्ट हवेत तरंगत रहाते.


-------------------------

नवनिर्मिती आधीच्या निर्मितीपेक्षा जास्त चांगली अथवा जास्त वाईटही होऊ शकते.पण निदान निर्मितीच्या प्रक्रियेमधला कंटाळा गेल्याचं समाधान तर मिळतं. शिवाय निर्मितीचा आनंद क्रिएटिव्ह असेलही पण उध्वस्त करायचा आनंदही समाधान (कदाचित जास्तच) देणारा असतो हेही कळतं.

खंडहर उध्वस्त केल्याशिवाय नवी नगरे वसवू नका.
रस्ते बांधायचे असतील तर डोंगर कडे उध्वस्त करायलाच लागतात वाटेतले.
आणि हो.. हे कसं विसरणार मी? For making an omelette eggs has to be broken..

------------------------------

नव्या घरी रहायला जाताना जुन्या अलमारीची साफ़सफ़ाई,आवराआवरी करायलाच हवी.शक्यतो त्यातलं काहीच बरोबर न्यायचं नसतं.अगदी ती जुनी अलमारीही नाही.भंगार मधे विकून टाकायची किंवा जुन्याच जागी कोपर्यात ठेऊन जायची.
कायमचं देशात परतायचा निर्णय घ्यायचा असेल तर नाही्च जमलं तर परत येऊ च्या कुबड्या आधी फ़ेकाव्या लागतात.

परतीचे दोर कापल्याशिवाय ती अशक्य वाटणारी उडी घेता येणं शक्यच होत नाही.

निर्णय छोटासाच असतो पण वेळेवर घेतला नाही तर मगजमारी किती होते!
अर्थात ह्या प्रक्रियेमधे केव्हढं शहाणपणही पदरात पडतं जातं हा ऍडेड बोनसच की.

26 comments:

Meghana Bhuskute said...

तुझ्या अशा नितळ प्रामाणिक लिहिण्याची किती मदत होते, हे कसं सांगणार तुला ट्युलिप? कधी कधी संवादांचे रस्ते नसतातच.

Sneha said...

thanx tulip....

Snehal Nagori said...

very true...
All the Best!

Ashwinis-creations said...

How transperntly written....!

and How obviously simple!


Awesome

Raj said...

गोष्ट विचार करायला लावणारी आहे. आणि सिस्टीन चेपेल पाहिल्यावर त्याने असे का केले हे ही कळते. Nice post!

Monsieur K said...

another classic case of rationalization.. or post-purchase-resonance-reduction in marketing terms :)

manaat aalelaa pahila vichaar saraL tyaach shabdaat maaNDalaa mee...

is that why you have removed all your earlier posts? but many, rather all would agree with me that they were not some arbit work.. rather, they were a masterpiece themselves...

am sure mere mortals like me would have said the same to michaelangelo, contesting his decision to remove the plaster & start from the scratch...

on second thoughts, taking the idea of a new beginning to other things in life, other than blogging... yeah, makes complete sense to let go of all things that hold u back.. so that u can make a fresh start...

gammat aahe.. mi swatahalaach contradict karat aahe.. or maybe not..

Monsieur K said...

majhe marketing concepts chuklele aahet.. the correct term is "post-purchase-dissonance-reduction".. not resonance :D

a Sane man said...

nice...

ekdam paTala...

ni je kahi navin ghaDavaNares tyasaThi shubhechchha!

Vidya Bhutkar said...

"परतीचे दोर कापल्याशिवाय ती अशक्य वाटणारी उडी घेता येणं शक्यच होत नाही.
निर्णय छोटासाच असतो पण वेळेवर घेतला नाही तर मगजमारी किती होते!
अर्थात ह्या प्रक्रियेमधे केव्हढं शहाणपणही पदरात पडतं जातं हा ऍडेड बोनसच की."
Agadi majhya manatala. :-) Tujhe blogs vachun khup divasani olakhicha blog vachalyacha anand pan jhala. :-)Navin barech lok distat pan ti maja yet nahi asa kadhitari vatat ani aaj te patla.
-Vidya.

MuktaSunit said...

तुमचा ब्लॉग आवडला. त्याचे रूप फारच छान आहे. भाषेतली नजाकत एकूण ब्लॉगच्या रूपड्याशी स्पर्धा करणारी वाटली.

हे पोस्ट देखील एलीगंटच आहे - इन कीपींग वुइथ द स्टाइल. नवी सुरवात , नवा कॅनव्हास , नवा फ्रेस्को हे सारे अतिशय आकर्षक आहे. मात्र नवी सुरवात करायची संधी म्हणा, अवसर म्हणा बर्‍याचदा मिळत नाही असेही होते. पोस्ट आवडले. आता जमेल तशी मागची पोस्ट वाचत आहे. सगळा अनुभव आनंददायक आहे.

HAREKRISHNAJI said...

Let it Go

Parag said...

Subhash Avachat chaya "Studio" madhle sandarbha ka? vegLa type aahe to ekdam.

Samved said...

It reminded me "Studio" but of course context differs...simple but powerful...destruction for construction!!!

Aalhad said...

Gokhale bai...too good
manapasun aavadla!!

mahiways said...

Really Cool Blog!!

http://mimarathicha.blogspot.com

Prashant Upasani said...

व्वा ट्युलिप, जुने जाउद्या मरणालागूनी छानच टीपलयस.. तुझ्या मनात काय चाल्लं असेल ह्याचा अचूक अंदाज येतोय.. लिहिती रहा अशीच..

Akira said...

Tulip,

Tujhe vichar patle..chaan lihila ahes...

mala watata ki manapasun ani swatahashi sachha rahun kahi nirmaan kele ki te sundarach hote..tyamule swatahashi aslela sacchepana mahatwacha!

Vikrant Deshmukh...The Writer said...

Hey Thanks for your nice words.
I still cant believe that the person about whom you are reading only in newspapers is directly talking to you.
Let me come out of that shock first :-)
After reading your posts, i often go in solitude and sit silent for long time.
My writing is not as ecstatic & fluent as yours. But Blogging is something i wanted to do from many years....and now that dream is coming true.
If you get time, please read my two posts "Opaque Prose - 1" and "Opaque Prose - 2" which i reckon my best expressions so far....
See if you like it.
and taking inspirations from you now I am going to post my Marathi articles and poems as well !!!

सौ. सुचित्रा बनसोडे said...
This comment has been removed by the author.
Meghana Bhuskute said...

हे! यू आर बॅक... :)

सौ. सुचित्रा बनसोडे said...
This comment has been removed by the author.
Samved said...

Tai, lihnar ka aapan?

स्वाती आंबोळे said...

ट्यू, तुला
http://paarijaat1.blogspot.com/2008/08/blog-post.html
इथे खो दिलाय बघ.

snehal nagori said...
This comment has been removed by a blog administrator.
TheKing said...

Where have you disappeared? When is the new post coming?

atul said...

हाय ट्युलिप,
तुझा ब्लॉग अगदी मन लाऊन वाचायचो,
पण कधीच अभिप्राय दिला नव्हता.
मध्ये तो " बाय इंव्हिटेशन ओन्ली" झाला तेव्हा खट्टू झालो होतो.
परत लिहायला लागलीस ते छान केलेस,
एकच विनंती,
जुन्या पोस्ट काढू नकोस,त्या माझ्या सारख्या कित्येक लोकांच्या नॉस्टॅल्जिआ चा भाग आहेत.
हवे तर वेगळ्या जागी अर्काईव करून ठेव.

पुढील लेखनास शुभेच्छा.